Tue, Jul 23, 2019 07:15होमपेज › Solapur › शेतकऱ्यांनी पाणीपट्टी द्यावी, नाहीतर उन्हाळ्यात पाणी नाही : सिध्दमल 

शेतकऱ्यांनी पाणीपट्टी द्यावी, नाहीतर उन्हाळ्यात पाणी नाही : सिध्दमल 

Published On: Mar 10 2018 6:24PM | Last Updated: Mar 10 2018 6:24PMमाळीनगर  : वार्ताहर 

नीरा उजवा कालव्यावरील शेतक-यांना पाणी पट्टीची रक्कम थकबाकीसह भरावी लागेल. ही रक्कम भारल्याशिवाय शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाचे पाणी द्यायचे नाही. असा निर्णय महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने घेतला असल्याचे पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यु. व्ही. सिध्दमल यांनी सांगितले.

संपूर्ण नीरा उजवा कालवा उपविभागाची जेवढी थकबाकीची रक्कम आहे. त्यापैकी निम्मी थकबाकी एकट्या माळशिरस तालुक्यातील आहे. जोपर्यंत ही थकबाकी भरली जात नाही तोपर्यंत उन्हाळी हंगामाचे पाणी मागणी अर्ज नमुना नंबर सात शेतकऱ्यांकडून स्विकारले जाणार नाहीत असे सबंधित सर्व उपविभागांना कळविण्यात आल्याचे सिध्दमल यांनी सांगितले. पाणी मागणी अर्ज न देणा-या शेतक-यांना पाणी मागण्याचा हक्क राहणार नाही. माळशिरस तालुक्यातील ज्या शेतक-यांची 25 हजार पेक्षा जास्त पाणी पट्टीची थकबाकी आहे त्यांची नावे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली तरीही थकबाकी जमा होत नाही. या थकबाकीदारांमुळेच सबंध माळशिरस तालुक्याचे नुकसान होत आहे. 

नीरा उजवा कालवा विभागाची १४ कोटी ४२ लाख रूपये थकबाकी आहे. त्यामध्ये वीर ऊपविभागाची १० लाख, फलटण ५ कोटी ९५ लाख,  माळशिरस ऊपविभागाची ६ कोटी ८९ लाख, पंढरपूर १ कोटी ५७ लाख रूपये थकबाकी आहे. 

माळशिरस तालुक्यातील शाखानिहाय थकबाकी अशी आहे.

नातेपूते - 96 लाख 9 हजार 843 रूपये. 

माळशिरस -  30 लाख 92 हजार 345 रूपये. 

खंडाळी - 55 लाख 51 हजार 856 रूपये. 

महाळूंग -  16 लाख 41 हजार 248 रूपये. 

वेळापूर - 92 लाख 48 हजार 700 रूपये. 

भाळवणी शाखा नंबर एक - 68 लाख 79 हजार 419 रूपये. 

भाळवणी शाखा नंबर दोन -  51 लाख 7 हजार 77 रूपये.