Sat, Sep 22, 2018 12:37



होमपेज › Solapur › सोलापुरात 'महाराष्‍ट्र पोलिस बॉय'चा मोर्चा(video)

सोलापुरात 'महाराष्‍ट्र पोलिस बॉय'चा मोर्चा(video)

Published On: Feb 08 2018 2:43PM | Last Updated: Feb 08 2018 2:42PM



सोलापूर : पुढारी ऑनलाईन

पोलिसांच्या मुलांची संघटना असणार्‍या महाराष्‍ट्र पोलिस बॉय संघटनेच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिस सेवेत असताना त्यांच्या बेरोजगार मुलांना इतरत्र पोलिस सेवेत सामावून घेण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्‍हाधिकार्‍यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

महाराष्‍ट्र पोलिस बॉय संघटनेच्या मागण्या :

१) महाराष्ट्रात पोलिस भरती घेताना रिक्त पदे न भरता मोठी मेगा भरती घ्यावी.

२) पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई प्रमाणे राज्यातील पोलिसांची ड्युटी ८ तास करावी.

३) पोलिसांना ७ वा वेतन आयोग लागू करावा.

४) पोलिस सेवेत असताना त्याच्या बेरोजगार मुलांना राज्यात अन्य ठिकाणी पोलिस सेवेत सामावून घ्यावे.

५) सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍यांना कुटूंब आरोग्य कल्याणकारी योजना वैद्यकीय सुविधा देण्यात यावी.

६) पोलिसांना त्यांच्या मालकीची घरे घेण्यासाठी कर्ज जाचक अटी रद्द कराव्यात.