Sat, Apr 20, 2019 09:58होमपेज › Solapur › माघीसाठी पंढरीत 2 लाखांवर भाविक; आज यात्रा

माघीसाठी पंढरीत 2 लाखांवर भाविक; आज यात्रा

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 11:35PMपंढरपूर : प्रतिनिधी

रविवारी होणार्‍या माघ यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक व वारकरी संप्रदाय पंढरीत येत आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत  दोन लाखांवर भाविक येथे दाखल झाले असून चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात 457 पैकी 410 दिंड्यांचे प्लॉट बूक झाल्याने सध्या वारकर्‍यांच्या दिंड्यांनी भक्‍तिसागर मैदान गजबजून गेले आहे.

माघ एकादशीसाठी आलेल्या वारकर्‍यांना प्रशासनाने भक्‍तिसागर  (65 एकर जागेवर) येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एकादशीचा सोहळा साजरा होत असल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून येथे भाविकांचा ओघ वाढला आहे. यामध्ये तंबू, राहुट्या उभारण्यासाठी स्वतंत्र प्लॉट, पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था, तात्पुरते स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते, कायमस्वरूपी स्वच्छतागृहे आदींचा समावेश आहे. शनिवार सायंकाळपर्यंत 65 एकरांमध्ये वारकर्‍यांसाठी एक-एक गुंठ्यांचे 457 प्लाँट असून त्यामधील  410 दिंड्यांचे प्लाँट बूक झाले असून या दिंड्यांबरोबर येणार्‍या दोन लाख वारकर्‍यांच्या निवासाची सोय येथे होणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या सुविधा केल्याने वारकरी व भाविकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.