Sat, Jun 06, 2020 19:48होमपेज › Solapur › मेजर जुबेरपाशा काझी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मेजर जुबेरपाशा काझी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 9:23PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुकचे सुपुत्र मेजर जुबेरपाशा हबीब काझी यांना नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री निधीतून साडेपाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

जुबेरपाशा काझी यांनी जम्मू- काश्मीर येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांना ठार केले होते. या पराक्रमाबद्दल काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्यावतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘सेना मेडल’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मेजर जुबेरपाशा काझी यांच्या धाडसी कार्याची दखल घेत राज्य सरकारने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री निधीतून साडेपाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील व नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.