Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Solapur › जमिनीच्या वादातून माढ्यात महिलेचा खून

जमिनीच्या वादातून माढ्यात महिलेचा खून

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:43PMमाढा : वार्ताहर

महातपूर (ता. माढा) येथे शेतजमिनीत जाण्या-येण्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून महिलेचा खून केल्याप्रकरणी पाच जणांवर माढा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पाचही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

निर्मला भूपाल वसगडेकर (वय 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. राजेंद्र देवेंद्र वसगडेकर, युवराज राजेंद्र वसगडेकर, छाया राजेंद्र वसगडेकर, सुकुमार बाबुराव कोटावळे, समाधान महावीर वारे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत मृताचा मुलगा प्रशांत भूपाल वसगडेकर याने माढा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

माढा येथील रहिवासी वसगडेकर कुटुंबाची शेजारील निमगाव शिवारात शेती आहे. शेतात जाण्या-येण्याच्या कारणावरून वसगडेकर भावकीत गेल्या दीड महिन्यापासून वाद उत्पन्‍न झाला आहे.