Fri, Jul 19, 2019 23:09होमपेज › Solapur › भरधाव टेम्पोचा टायर फुटल्याने २८ जखमी

भरधाव टेम्पोचा टायर फुटल्याने २८ जखमी

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 10:07PMमाढा : वार्ताहर

दशक्रियाविधी उरकून पंढरपूर येथून उक्कडगाव, ता. बार्शीकडे परत येत असताना भरधाव टेम्पोचे मागील टायर फुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात अठ्ठावीस जण जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माढा ते पंढरपूरदरम्यान उपळाई बुद्रूक गावाजवळील जाधववस्तीनजिक घडली. जखमींमध्ये एकोणीस महिलांचा समावेश आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून हे प्रवासी सुखरुप बचावले आहेत.

सविस्तर असे, की उक्कडगाव येथील पाटील कुटुंबातील द्रौपदी इंदरराव पाटील या मयत झाल्या होत्या. त्यांच्या दशक्रियाविधीसाठी पंढरपूर येथे पाटील कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक असे सर्व मिळून पस्तीस जण एका टेम्पोमधून गेले होते. हा विधी उरकून गावी परतत असताना उपळाई बु. गावानजिक अचानकपणे टेम्पोचे मागील टायर फुटल्याने टेम्पो पलटी झाला. 
अपघातानंतर जखमींना माढा व शेटफळ येथील दोन सरकारी रुग्णवाहिकेतून माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बार्शी येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. 

यामध्ये आशा रामचंद्र डोळे (वय 45), सुशीला सुंदरराव पाटील (42) या दोघींना डोक्यास दुखापत झाली आहे. तर अरूण इंदरराव पाटील (40), उषा अरूण पाटील (37), आण्णासाहेब इंदरराव पाटील (37), बाबासाहेब त्रिंबक मुंडे (50), महानंदा नामदेव दराडे (55) हे जखमी झाले आहेत. इतर जखमींमध्ये सुंदरराव चांगदेव पाटील (46), मुक्ता संजय वाघ (35), व्यंकटी नागनाथ घुगे (45), उद्धव दशरथ मुंडे (70),  कोंडाबाई उद्धव मुंडे (65), सुनिता व्यंकटी घुगे (35), विमल बाबासाहेब मुंडे (40), आशा भागवत मुंडे (35), आशा सुभाष लिकड (45), उषा उद्धव लाटे (35), लिंबाजी तात्या सोनवणे  (65), इंदरराव चांगदेव पाटील (65), प्रियंका धनंजय मुंडे (30), कौशल्या विनायक दराडे (65), रत्नमाला बबन सानप (30), ताई सिद्धेश्‍वर जाधवर ( 40), अच्युतराव विठ्ठल सानप (73), अर्जुन नारायण सोनवणे (42 सर्व रा. उक्कडगाव)  कस्तुराबाई केशव पाटील (70 रा. धोत्री, ता. बार्शी), सिंधूबाई फुलचंद घोळवे (55 रा. सोनारवाडी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), लिलावती नारायण केदार (60, रा. सांगवी, ता. केज, जि. बीड या सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे.