Sun, Mar 24, 2019 04:20होमपेज › Solapur › प्रेयसीच्या मृत्यू प्रकरणी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

प्रेयसीच्या मृत्यू प्रकरणी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Published On: Sep 12 2018 8:23AM | Last Updated: Sep 12 2018 8:23AMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

प्रेसयीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कामती पोलिसांनी तिच्या पिययकराला ताब्‍यात घेतले आहे. द्वारकेश दिनकर सुर्यवंशी (रा. माने गल्ली, मंगळवेढा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्‍या पियकराचे नाव आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मृत्‍यू झालेली प्रेयसी व द्वारकेश सुर्यवंशी यांची २०१३ मध्ये सोलापूर येथे झेरॉक्सच्या दुकानात ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांचे प्रेमसंबंध जुळले. तेंव्हापासून ते दोघे एकत्र राहत होते. द्वारकेश सुर्यवंशी याचे वडदेगाव( ता. मोहोळ) येथे शेत असून, शेतातील पत्रा शेडमध्ये हे दोघे जण मुक्कामास थांबत होते. १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. च्या दरम्यान मयत प्रेयसी ही मंगळवेढा येथे आली व ते दोघेजण पुढे सांगली येथे जावून रात्री दहा वाजता वडदेगाव येथील शेतामध्ये मुक्कामीसाठी आले. दिनांक ११ सप्टेंबर रोजी मयत प्रेयसीच्या मोबाईलवर सकाळी १० वाजून ४ मिनिटांनी एक फोन आला. त्यावरून त्या दोघांचे भांडण झाले. त्‍यानंतर मयत महिला तेथून निघून गेली. त्‍यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला असता बाजूला असलेल्या खोलीमध्ये तिच्या हातामध्ये पिकावर फवारण्याची न्युआन बाटलीची आढळून आली. त्यावेळी तिच्या तोंडातून औषधाचा उग्र वास येत होता. मयत महिलेस उपचारासाठी तात्काळ मंगळवेढा येथे सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्‍यू झाल्‍याचे द्वारकेश सुर्यवंशी याने दिलेल्या खबरी जबाबामध्ये म्हटले आहे.

मयत ही कामती  पोलिस स्टेशन हद्दीतील असल्यामुळे कामतीचे पोलिस हवालदार शंकर चव्हाण यांनी मंगळवेढा येथे येवून द्वारकेश सुर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे.