Thu, Sep 20, 2018 04:26होमपेज › Solapur › लोकमंगल कर्मचार्‍यांनी स्वतःच्या लग्नात केले रक्तदान

लोकमंगल कर्मचार्‍यांनी स्वतःच्या लग्नात केले रक्तदान

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:47PMसोलापूर : प्रतिनिधी

लोकमंगल फाऊंडेशन आयोजित लोकमंगल कर्मचारी विवाह सोहळा रविवारी लोकमंगल साखर कारखाना, बीबीदारफळ येथे थाटामाटाने पार पडला. या विवाह  सोहळ्यात लोकमंगल  उद्योग  समूहातील   कर्मचारी, त्यांच्या मुला-मुलींचे, त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या भाऊ-बहिणींची लग्ने लावण्यात येतात. यंदाच्या विवाह सोहळ्यात लोकमंगल फाऊंडेशनचे जावई अजित व्हटाणे यांनी विवाह सोहळ्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात स्वखुशीने रक्तदान केले. आपल्या लग्नात लग्नाची आठवण म्हणून रक्तदान करणे ही एक सामाजिक  जबाबदारी म्हणून रक्तदान करून एक आदर्श समोर ठेवला.

लोकमंगल फाऊंडेशन आयोजित या पारिवारिक विवाह सोहळ्यामध्ये लोकमंगल परिवारातील सात जोडप्यांचे विवाह थाटामाटात लावण्यात आले. लोकमंगल परिवारातील मोजक्याच प्रमाणात इच्छुकांचे विवाह थाटात, सुटसुटीत व नेटकेपणाने पार पाडण्याचा पायंडा लोकमंगल फाऊंडेशनने घेतला आहे. या विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरास हळदी व लग्नाचे कपडे, मणीमंगळसूत्र, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू लोकमंगल फाऊंडेशनमार्फत देण्यात आल्या.

वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष, सहकार, वस्त्रोद्योग व पणनमंत्री सुभाष देशमुख, महेश देशमुख, मनिष देशमुख, शहाजी पवार, दिनकर देशमुख, विजय जाधव, विवेक पवार व लोकमंगल उद्योग समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक, जोडप्यांचे वर्‍हाडी उपस्थित होते.