Tue, Jul 16, 2019 01:41होमपेज › Solapur › किरकोळ वादातून लहान भावाचा डोक्यात गज घालून खून

किरकोळ वादातून लहान भावाचा डोक्यात गज घालून खून

Published On: Jul 05 2018 6:31PM | Last Updated: Jul 05 2018 6:31PMवैराग : प्रतिनिधी

शेतगड्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून लहान भावाच्याच डोक्यात लोखंडी गण घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज जाधव असे या मृताचे नाव आहे. हत्तीज येथे काल, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यातील संशयित आरोपी सुहास सुर्यकांत जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  एकाच आठवडयात खूनाच्या अशा दोन मोठ्या घडल्याने बार्शी तालुका हादरून गेला.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, सुहास सुर्यकांत जाधव हे आपल्या पत्नी, वडील व लहान भाऊ सूरजसह हत्तीज येथे एकत्रित राहतात. सुहास याने आपल्या शेतात शेतगडी म्हणून काम करणाऱ्या सुनील नागनाथ क्षीरसागर यास किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. यास त्याचा लहान भाऊ सुरज याने विरोध केला होता. 

हाच राग मनात ठेवत मध्यरात्री शेतात एकटाच झोपलेल्या सुरजच्या डोक्यात सुहासने लोखंडी गज घालून सुड उगवला. झोपेत असलेल्या सूरजवर केलेला हा  हल्ला इतका तीव्र होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच बार्शी येथे त्याला उपचारासाठी नेले मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  सांगितले. संबंधित घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर, तपास करीत असताना शेतात लपून बसलेलेल्या संशयित आरोपी सुहास यास ताब्यात घेतले. याघटनेचा अधिक तपास पोलिस निरिक्षक सुहास जगताप करीत आहेत .