Thu, Jun 27, 2019 09:37होमपेज › Solapur › १९ गुन्ह्यात २० आरोपींकडून २९ हजारांची ६४० लिटर हातभट्टी जप्‍त

१९ गुन्ह्यात २० आरोपींकडून २९ हजारांची ६४० लिटर हातभट्टी जप्‍त

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:57PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शहर पोलिसांनी शहरात हातभट्टी विकणार्‍यांविरोधात मोहीम उघडली असून विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी विकणार्‍यांवर कारवाई करीत 19 गुन्हे दाखल करुन 29 हजार रुपयांची 640 लिटर हातभट्टी जप्त केली.

विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे पुढीलप्रमाणे ः 
फौजदार चावडी पोलिस ठाणे ः दिनेश साहेब चंदनशिवे (वय 33, रा. हब्बू वस्ती, जुना देगाव नाका) 1510 रुपयांची 30 लिटर हातभट्टी, रुक्मिणी नागनाथ भोसले (45, रा. दामा हॉस्पिटलजवळ, बुधवार पेठ) 1500 रुपयांची 30 लिटर हातभट्टी.
जेलरोड पोलिस ठाणे ः अकबर रमजान शेख (वय 48, रा. मौलाली चौक) 640 रुपयांची 10 लिटर हातभट्टी, राजशेखर रवि पोतन (23, रा. कुचननगर) 5500 रुपयांची 110 लिटर हातभट्टी, नागनाथ अंबाजी करणकोट (66, रा. दत्तनगर, गिरी झोपडपट्टी) 160 रुपयांची 5 लिटर हातभट्टी.

एमआयडीसी पोलिस ठाणे ः प्रताप धुलचंद गुंगेवाले (41, रा. शिवगंगानगर, नई जिंदगी) 1050 रुपयांची 35 हातभट्टी, आसिफ अल्लाबक्ष शेख (32, रा. नवीन विडी घरकूल) 2550 रुपयांची 50 लिटर हातभट्टी, सुभाष भीमराव चव्हाण (37, रा. मुळेगाव तांडा, सोलापूर) 1500 रुपयांची 30 लिटर हातभट्टी, जनाबाई दगडू राठोड     ( 40, रा. कामगार वसाहत, सुनील नगर) 1 हजार रुपयांची 20 हातभट्टी,  श्रीनिवास पेंटप्पा चिरलंची (39, रा. गोदूताई विडी घरकूल) 310 रुपयांची 10 लिटर हातभट्टी, धर्मराज महादेव रोटे  ( 38, रा. कन्नाचौक) 1200 रुपयांची 40 लिटर हातभट्टी.
जोडभावी पेठ पोलिस ठाणे ः नागेश बसप्पा कोळी (48, रा. मुकुंद नगर) 2050 रुपयांची 40 लिटर हातभट्टी, धोंडाप्पा धरेप्पा कोळी (42, रा. अंबाबाई मंदिराजवळ, कलावतीनगर) 480 रुपयांची 10 लिटर हातभट्टी, रमेश पांडुरंग पांढरे आणि नरसिंग चव्हाण (रा. बक्षी हिप्परगा तांडा) 1620 रुपयांची 35 लिटर हातभट्टी, देविदास सूरज साठे (वय 29, रा. हनुमाननगर, बुधवार पेठ) आणि नरसिंग चव्हाण  (रा. बक्षी हिप्परगा) 1560 रुपयांची 35 लिटर हातभट्टी, प्रशांत शंकर गायकवाड (वय 33, रा. कुमार स्वामी नगर, शेळगी) 2120 रुपयांची 40 लिटर हातभट्टी.

सदर बझार पोलिस ठाणे ः मुस्ताक सय्यदसाब शेख (31, रा. पाथरुट चौक) 1560 रुपयांची 30 लिटर हातभट्टी, संगीता खाजप्पा आण्णारेड्डी ( 40, रा. पाथरूट चौक) 1250 रुपयांची 40 लिटर हातभट्टी, कलावती दीपक मनसावाले (46, रा. यल्लम्मा मंदिराजवळ) 1250 रुपयांची 40 हातभट्टी. अशी कारवाई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येणार आहे.