Fri, May 24, 2019 21:41होमपेज › Solapur › लातूर जिल्ह्यात वादळाचे थैमान, वीज पडून शेतकरी ठार

लातूर जिल्ह्यात वादळाचे थैमान, वीज पडून शेतकरी ठार

Published On: Apr 15 2018 7:59PM | Last Updated: Apr 15 2018 7:59PMलातूर : प्रतिनिधी

लातूर शहर व जिल्ह्यातील बऱ्याच गावात रविवारी झालेल्या वादळाने पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. किल्लारी येथे वीज पडून एक शेतकर्‍याचा मृत्यू झाला. राम माधव बिराजदार (वय ५९) असे त्यांचे नाव आहे. लातूर शहरात सायंकाळी पाच वाजता जोरदार वादळ झाले.

यामध्ये शहरात लावण्यात आलेले फलक फाटले गेले, घरांचे पत्रे उडाले आहेत. महानगर पालिकेजवळ एक झाड उन्मळून पडले. शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला. किल्लारी येथे दुपारी चार वाजता तुफान वादळी पाऊस झाला. यावेळी राम बिराजदार हे त्यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली थांबले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली.