Thu, Nov 15, 2018 01:41होमपेज › Solapur › सोलापूर : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

सोलापूर : वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Published On: Apr 15 2018 7:52PM | Last Updated: Apr 15 2018 7:52PMअक्कलकोट : वार्ताहर

अक्कलकोट शहर व तालुक्यात झालेल्या वादळी वार्‍याच्या पावसात तालुक्यातील चिंचोळी (न) येथे रविवारी सायंकाळी वीज पडून ५५ वर्षाचे शेतकरी जागीच ठार झाला आहे. ही घटना १५ एप्रिल रोजी दुपारी घडली आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे चिंचोळी (न) येथे राहणारे अलाउदीन दसगीर बेनुरे (वय ५५) हे नेहमीप्रमाणे शेळी घेऊन शेताकडे गेले होते. यावेळी दुपारी विजेसह पावसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यावर वीज कोसळून ते जागीच ठार झाले.तर भोसगे येथे एक बैल ठार झाला आहे.

रविवारी सायंकाळी अक्कलकोट शहर व तालुक्यातील  हन्नूर, चपळगाव, बावकरवाडी,  बासलेगाव, उडगी, तोळणूर, भोसगे, गळोरगी, मैंदर्गी, दुधनी, नागणसूरसह परिसरातील गावामध्ये वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला.