Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Solapur › टायर शोरूम फोडून लाखोंचा माल लंपास

टायर शोरूम फोडून लाखोंचा माल लंपास

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:40PM

बुकमार्क करा
टेंभुर्णी : प्रतिनिधी

येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील बालाजी ट्रेडर्स या टायर शोरूमचे शटर उचकटून चोरट्याने रोख रकमेसह 3 लाख 81 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने व्यापारीवर्गात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री ते रविवारी हाटेदरम्यान घडली असून सकाळी 8 वा. उघडकीस आली आहे.

 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बालाजी ट्रेडर्स हे एम.आर.एफ. कंपनीच्या टायरचे शोरूम असून अज्ञात चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून शोरूममधील 15 हजार रुपये रोख रक्‍कम, सोनी कंपनीचा लॅपटॉप किंमत 25 हजार रुपये, सी.सी.टी.व्ही.चा एलसीडी व डी. व्ही.आर. किंमत 22 हजार रुपये, असा एकूण 62 हजार रुपयांचा ऐवज तसेच एम. आर.एफ. कंपनीचे वेगवेळ्या साईजचे 224 टायर किंमत 3 लाख 19 हजार 700 रुपये, असा एकूण 3 लाख 81 रुपयांचा माल चोरीस गेला आहे.

शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे शोरूम बंद करून घरी गेल्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी याकालावधीत   या धाडसी चोरीची घटना घडली आहे.  
शोरूमचे मालक  दीपक दिलीप पाटील हे असून शोरूमचा मॅनेजर संदीप अशोक ढेरे (रा. नगोर्ली, ता. माढा) हे रविवारी सकाळी शोरूम उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. याची फिर्याद संदीप ढेरे यांनी दिली असून सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने व्यापारीवर्गातून खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही झालेल्या एकाही चोर्‍यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढतच चालले आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक पी. के. मस्के करत आहेत.