Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Solapur › कोल्हापूर खंडपीठ लढ्याबाबत बार असो. बैठक संपन्‍न

कोल्हापूर खंडपीठ लढ्याबाबत बार असो. बैठक संपन्‍न

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:51PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ निर्मितीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पंढरपूर बार असोशिएशनच्यावतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर खंडपीठासाठी पाठपुरावा करणे, खंडपीठ कृती समितीला पाठिंबा देणेबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती बार असोशिएशनचे अध्यक्ष अल्ताफ शहानूरकर यांनी दिली.

कोल्हापूर खंडपीठ निर्मितीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील बार असोशिएशन यांच्यावतीने लढा सुरू आहे. खंडपीठ कोल्हापूर येथे तयार झाले तर पक्षकार व वकील मंडळी यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला खंडपीठ निर्माण होण्यासाठी उभारलेल्या लढ्याला अधिक गतीमान करण्यासाठी पंढरपूर बार असो.च्यावतीने गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालय येथील बार रुममध्ये दुपारी 2 वा. बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.अ‍ॅड.अल्ताफ शहानुरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच खंडपीठ कृती समितीबरोबर चर्चा करून पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरवण्यात आली. या बैठकीस बार असोशिएशनचे अ‍ॅड. डी.जे. भोसले, अ‍ॅड. राजेश भादुले, अ‍ॅड. गाजरे, अ‍ॅड. वाय.जी.माने, अ‍ॅड. मुळे यांचेसह खंडपीठ कृतीसमितीचे अ‍ॅड. प्रशांत शिंदे,  अ‍ॅड. सचिव किरण पाटील, अ‍ॅड. सत्त्वशील लाड, अ‍ॅड.शिवाजीराव राणे अ‍ॅड. अजित मोहिते,अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण अ‍ॅड.पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.