Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Solapur › अक्‍कलकोटमध्ये चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात तरुणी जखमी

अक्‍कलकोटमध्ये चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात तरुणी जखमी

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:50PM

बुकमार्क करा

अक्‍कलकोट : प्रतिनिधी 

येथील जेऊर रोडवरील समर्थ नगरमधील घरात सहा जानेवारी रोजी रात्री सव्वातीनच्या दरम्यान चोरट्याने घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरात घुसून तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्या डाव्या हाताला जखमी करून मोटारसायकल घेऊन पळून गेल्याची घटना घडली. याची उत्तर पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. या घटनेची फिर्याद राजकुमार अमोगी (वय 52) यांनी दिली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजकुमार अमोगी व त्यांच्या पत्नी व मुलगी आपल्या घरातील दुसर्‍या मजल्यावरील समोरासमोरील बेडरूममध्ये झोपले होते. रात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने अमोगी बाहेर जाऊन बघण्यासाठी बेडरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता  दरवाजा बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले.

कोणीतरी अज्ञात माणसाने पाठीमागच्या दरवाज्याची कडी तोडून मुलीच्या बेडरूममध्ये प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. यामध्ये त्यांचा चाकू मुलीच्या डाव्या हातास लागून गंभीर जखम झाली. आरडाओरडा ऐकून चोरट्याने मोटारसायकलची चावी घेऊन पळून गेला. लगेच शेजारच्याने पोलिस स्टेशनला माहिती दिली. मुलीला उपचारासाठी सोलापूर येथील दवाखान्यात दाखल केले. चोरट्याने शेजारील घराचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद केल्याने आरडाओरड ऐकूनही त्यांना मदतीला येता आले नाही. एकट्या मुलीने धीराने आरडाओरड करून प्रसंगावधान राखले. सकाळी श्‍वानपथक व फॉरन्सीकच्या पथकाने भेट देऊन पाहाणी केली.  चोरट्याने घरात घुसल्यानंतर वीज बंद केली. सुमारे अर्धा तास आरडाओरड व थरार सुरू होता. घरात माणसे असतानाही चोर शस्त्र घेऊन घुसले, याबद्दल शेजारच्या घरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.