होमपेज › Solapur › कारला थांबवून लुटले; लाखाचा मुद्देमाल घेऊन चोरांचे पलायन 

कारला थांबवून लुटले; लाखाचा मुद्देमाल घेऊन चोरांचे पलायन 

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:38PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

पांगरे (ता. करमाळा) या रस्त्यावरून जात असताना कारवर दगड मारून ती थांबल्यानंतर 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार पांगरे-कंदर रस्त्यावर पांगरे शिवारात रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी अशोक दत्तात्रय कदम (वय 47, रा. साडे, ता. करमाळा, हल्ली रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 
कदम परिवारासोबत साडे येथे देवकार्य आटोपून निमगावकडे (टे) निघाले होते. रात्री दहा वाजता पांगरे-कंदर रस्त्यावरून जाताना पांगरेपासून अलीकडे अर्धा किलोमीटर अंतरावर गाडीवर दगड मारल्याचा आवाज आला. काय झाले पाहण्यासाठी फिर्यादी कदम यांचे मेव्हणे गाडीतून खाली उतरले. त्यावेळी 25 वयोगटातील चार तरुण समोर आले व गाडीतील बसलेल्या सर्वांना धमकी दिली. यावेळी कदम कुटुंबाकडे असलेली पंचवीस हजार रुपयांच्या रोख रकमेसह साडेतीन तोळे सोने, दोन मोबाईल असा 1 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.