Wed, Mar 27, 2019 06:05होमपेज › Solapur › मोटारसायकल-जेसीबीच्या धडकेत विद्यार्थी ठार

मोटारसायकल-जेसीबीच्या धडकेत विद्यार्थी ठार

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 10:18PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

शाळेच्या पहिल्याच दिवशी  महाविद्यालयीन विद्यार्थी मोटारसायकलवरून जात असताना जेसीबीला झालेल्या अपघातात जागीच ठार झाला, तर अन्य एक गंभीररीत्या जखमी झाला.
ऋषीकेश ऊर्फ दादा राजू कांबळे (वय 18) असे मृताचे नाव आहे. तर अविनाश विठ्ठल कांबळे (20, दोघे रा. चिखलठाण नंबर 1) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी जेऊर-शेटफळ-चिखलठाण या रस्त्यावर दादासाहेब लबडे यांच्या वस्तीजवळ झाला.

अविनाश कांबळे व ऋषीकेश  कांबळे हे दोघे मोटारसायकलवरून जेऊर येथून संगणकाचा तास करून चिखलठाण येथील घराकडे जात होते. यावेळी अचानक जेसीबी रस्त्यावर आल्याने मोटारसायकल व जेसीबी यांची धडक होऊन राजू कांबळे हा जागीच ठार झाला, तर अविनाश कांबळे हा जबर जखमी झाला आहे. यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे, रंजित लबडे, दत्ता आरकेले, सुधीर पोळ आदींनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. 

भारत महाविद्यालयात बारावीमधील विद्यार्थी ऋषीकेश कांबळे याला अपघातात प्राण गमवावा लागल्याने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञात जेसीबी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, हे. कॉ. बिपीन सुरवसे हे तपास करीत आहेत.