Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Solapur › कुंभेज येथे अपघातात तरूणाचा मृत्यू

कुंभेज येथे अपघातात तरूणाचा मृत्यू

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:32PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी सुजित सुशेन शिंदे (वय 21) याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अहमदनगर-टेभुर्णी राष्ट्रीय महामार्गावर जेऊरजवळील कुंभेज फाट्याजवळ घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, सुजित शिंदे हा नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जीममध्ये मोटारसायकलवरून कुंभेज येथून जेऊरला जात होता. यावेळी एकतपुरे फार्मजवळील वीटभट्टीनजीक आला असता त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यावेळी 108 क्रमाकांची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्याला कुंभेजचे माजी सरपंच दादासाहेब चौगुले यांनी प्रथम करमाळा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी रूग्णाची गंभीर परिस्थिती पाहता त्याला पुढील उपचारासाठी अकलूज येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत सुजित हा चव्हाण महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत होता.त्याच्यावर कुंभेज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुजित शिंदे याच्या अपघाती व आकस्मात मृत्युने कुंभेज गावावर शोककळा पसरली होती.सुजितच्या पश्‍चात आई, वडील, आजी, आजोबा व भाऊ  असा परिवार आहे.