Mon, Aug 19, 2019 00:49होमपेज › Solapur › कृषी अधिकार्‍याचा  विजेच्या धक्क्याने मृत्यू

कृषी अधिकार्‍याचा  विजेच्या धक्क्याने मृत्यू

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:34PM

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी 

शेतातील विहिरीची विजेची मोटार चालू करण्यास गेलेल्या कृषी अधिकार्‍याचा इलेक्ट्रिक शॉक लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.पृथ्वीराज शिवाजीराव देशमुख (वय 39, रा. वांगी क्रमांक 1) असे विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या कृषी अधिकार्‍याचे नाव आहे. 

पृथ्वीराज हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत होते. शेतातील उसाला पाणी देण्यासाठी ते विहिरीवरील विजेची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यांना यावेळी विजेचा तीव्र धक्‍का लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्यांचे भाऊ राकेश देशमुख व नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, एक विवाहित बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. येथील वकिली व्यवसाय करणारे अ‍ॅड. राकेश देवीदास देशमुख यांचे ते चुलत भाऊ होते. रात्री उशिरा पृथ्वीराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. दरम्यान, करमाळा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, हवालदार विपीन सुरवसे पुढील तपास करीत आहेत.