Mon, Jun 24, 2019 21:15होमपेज › Solapur › करम-ए-मौलाअली दर्गाह मस्जिद येथे ईफ्तार पार्टी

करम-ए-मौलाअली दर्गाह मस्जिद येथे ईफ्तार पार्टी

Published On: May 26 2018 10:38PM | Last Updated: May 26 2018 10:38PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानतर्फे रमजान ईदनिमित्त करम-ए-मौलाअली दर्गा मस्जिद येथे रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाच्या उपस्थितीत रोजदार मुस्लिम बांधवांना खजूर व फराळाचे वाटप करण्यात आले.

कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठान हे सामाजिक उपक्रमासाठी करमाळा शहरात प्रचलित आहे. या प्रतिष्ठानतर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम करमाळा शहरात राबविला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत हजारो गोरगरिबांनी मोफत कपड्यांचा लाभ घेतला आहे. तसेच मुक्या जनावरांसाठी शहरात 14 ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेऊन पाणी उपलब्ध करून दिले आहे. शहरातील युवकांच्या वाढदिवसानिमित्त हार, फेटा, शाल, श्रीफळ न देता महान थोर  पुरुषांचे फोटो भेट दिले जातात. 

मुस्लिम समाजाच्या निघालेल्या मूकमोर्चातही हजारो नागरिकांना मोफत पाण्याची सोय केली होती. मूकबधीर शाळेस अन्नदान करणे, असे विविध सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. या सामाजिक उपक्रमाचाच भाग म्हणून (ता. 24) रोजी मौलाली माळ येथे मुस्लिम समाजातील बांधवांना सर्व पत्रकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या हस्ते रोजा ईफ्तारसाठी फराळ वाटप करण्यात आला. करमाळा तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. 

यावेळी शहरातील सर्व मित्रपरिवार व मान्यवर उपस्थित होते. या ईफ्तार पार्टीचे आयोजन प्रतिष्ठानने केले होते. उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड यांनी करून आभार मानले. या उपक्रमाचे शहरातून सर्वत्र स्वागत होत असून हिंदू-मुस्लिमातील दरी दूर होण्यासाठी अशा उपक्र