Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Solapur › बुद्धिमान युवापिढीने उद्योजक व्हावे

बुद्धिमान युवापिढीने उद्योजक व्हावे

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:38PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शेती आणि शेतीचा ग्राहक यात मोठा बदल घडत आहे. हे लक्षात घेऊन यापुढच्या काळात बुद्धिमान युवापिढीने शेतीच्या क्षेत्रात उद्योजक व्हावे, असे मत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख प्रा. व्ही.  बी. जुगळे यांनी व्यक्त केले. सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिकशास्त्र संकुलातील कै. प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते यांच्या स्मरणार्थ गुरूवार, 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.  त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. प्रा. अशोककुमार होते. यावेळी व्यासपीठावर अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. उत्तमराव हुंडेकरी, सचिव डॉ. आर. के. पाटील, डॉ. संतोष कदम आणि डॉ. गौतम कांबळे उपस्थित होते. 

पुढे प्रा. जुगळे म्हणाले, तंत्रज्ञानाचा पुरेपुरू वापर करणारे कृषी उद्योजक निर्माण व्हावेत तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबू शकतील आणि शेतीचे चित्र बदलेल.
अध्यक्षीय भाषणात संचालक डॉ. अशोककुमार म्हणाले, भविष्यातील शेती कशी असेल याबद्दल जगभर विचार सुरू आहे. यात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन शेतकरी बाहेर फेकला जाण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी शेती करावी. यावेळी अभ्यास परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गौतम कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी मानले.