Mon, Jun 24, 2019 21:15होमपेज › Solapur › इंद्रायणी आजपासून रुळावर

इंद्रायणी आजपासून रुळावर

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 9:10PMसोलापूर : प्रतिनिधी

दुहेरीकरणाच्या कामामुळे सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने 15 दिवसांकरिता इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचा ब्लॉक घेतला होता.त्यामुळे सोलापुरातून दुपारच्या सत्रात निघणारी इंद्रायणी 1 एप्रिलपासून रद्द करण्यात आली होती. त्यासोबत इतर एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या व काही लांब पल्ल्याच्या गाड्या  वळविण्यात आल्या होत्या.आजपासून इंद्रायणीसह इतर लांब पल्ल्याच्या गाड्या व रद्द झालेल्या गाड्या आपल्या निर्धारित मार्गावरून  धावणार आहेत.

सोलापूर रेल्वे विभागाने पंधरा दिवसांच्या मुदतीत दुहेरीकरणाचे काम पूर्ण केले. सोमवारपासून इंद्रायणीसह रद्द करण्यात आलेल्या इतर गाड्या पूर्ववत निर्धारित वेळेनुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

वाकाव ते वडशिंगेदरम्यान 

रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने  पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस (इंद्रायणी) पंधरा दिवसांसाठी रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर सोलापूर-कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर-मिरज-सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे-सोलापूर डेमू पॅसेंजर आदी गाड्या रद्द केल्या होत्या. ऐन उन्हाळी सुट्टीत गाड्या रद्द झाल्याने सोलापूरकरांची मोठी गैरसोय झाली होती. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द झाल्याने हुतात्मा एक्स्प्रेस गेल्यानंतर 12 तासांनीच सोलापूरहून पुण्यासाठी गाडी होती. आता काम पूर्ण झाले असल्याने गाड्या पूर्ववत होत आहेत. शिवाय दुहेरीकरण झालेला 70 किमीचा मार्ग हा रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.