Sat, Jul 20, 2019 08:37होमपेज › Solapur › इंद्रायणी वेटिंगवरच

इंद्रायणी वेटिंगवरच

Published On: Feb 23 2018 10:47PM | Last Updated: Feb 23 2018 10:19PMसोलापूर ः प्रतिनिधी

  खडी बदलण्याचे काम संपूनदेखील इंद्रायणी वेटिंगवरच आहे. 1 नोव्हेंबरपासून बंद झालेल्या इंद्रायणीसाठी प्रवासी आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. दुपारच्या वेळेत पुणे शहराकडे जाणारा प्रवाशांचा लोंढा इतर गाड्यांवर वाढल्याने उद्यान, नागरकोईल या गाड्यांवरील ताण वाढतच चालला आहे.

जेऊर ते वाशिंबे यादरम्यान रेल्वे रुळाखालील खडी बदलण्याचे काम 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे इंद्रायणी 125 दिवसांसाठी रद्द करण्यात आली. 18 कि.मी.चे काम 125 दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. इंजिनिअरिंग विभागातील कर्मचार्‍यांनी 125 दिवसांऐवजी 107 दिवसांत कार्य पूर्ण केलेे. हे काम पूर्ण करण्यासाठी  बीसीएम व टॅपिंग या अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने काम फत्ते करण्यात आले. यापूर्वी डीआरएम हितेंद्र मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 5 मार्चपासून इंद्रायणी सुरु करु, असे आश्‍वासन दिले होते. पण काम 107 दिवसांत पूर्ण झाले असून 125 दिवसांचा ब्लॉक कशाला, असे अनेक प्रश्‍न नागरिक विचारु लागले आहेत. इंद्रायणी रद्द झाल्याने  रेल्वे  प्रशासनाने इतर रेल्वेगाड्यांच्या कोचच्या संख्येत वाढ केली होती. ही वाढ फेब्रुवारी माहिन्याच्या अखेरपर्यंत  वाढविण्यात आली आहे. इंद्रायणीमुळे भिगवण, जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर येथील प्रवाशांची सोय झाली होती.रुळाखालील खडी बदलण्याकरिता  रेल्वे प्रशासनाने 125 दिवसांसाठी इंद्रायणीला ब्रेक दिला होता. या निर्णयाने इंद्रायणीने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्‍त केला होता. लवकरात लवकर इंद्रायणी सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

125 दिवसांचे काम 107 दिवसांत

सोलापूर मध्य रेल्वे विभागातील जेऊर ते वाशिंबे यादरम्यान रुळाखालील खडी 125 दिवसांमध्ये बदलण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरु  झाले. यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस 125 दिवसांसाठी रद्द करण्यात आली होती. इंजिनिअरिंग विभागातील अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी हे कार्य 107 दिवसांत पूर्ण केले आहे.