Sun, May 26, 2019 11:21होमपेज › Solapur › सोलापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत जवान ठार

सोलापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत जवान ठार

Published On: Apr 25 2018 10:55PM | Last Updated: Apr 25 2018 10:55PMपंढरपूर : पुढारी ऑनलाईन

पंढरपूर-पुणे रस्‍त्यावर खडूसजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्यातील जवानाचा मृत्यू झाला. संतोष पोपट सावंत (वय २५ रा. धायटी, ता सांगोला) असे मृत जवानाचे नाव आहे. खडूसपासून एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या महांकाळ वस्‍तीजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. 

संतोष याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर संतोषला जखमी अवस्‍थेत अकलूज येथील राणे हॉस्‍पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Tags : indian army, solapur, pandharpur, jawan