Mon, Jun 24, 2019 21:04होमपेज › Solapur › वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग

वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग

Published On: Feb 28 2018 11:20PM | Last Updated: Feb 28 2018 11:20PMसोलापूर : प्रतिनिधी

वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग करणार्‍यांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यावरून एस.टी. बस घेऊन येणार्‍या महिला कंडक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी एस.टी. विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कटकधोंड नावाच्या व्यक्‍तीविरुध्द  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगळवारी दुपारी पीडित महिला ही एस.टी. सोलापूरकडे घेऊन येत असताना सायंकाळी सोलापूर बसस्थानकात बसमधून उतरताना कटकधोंड नावाच्या व्यक्‍तीने पीडित महिलेचा विनयभंग केला म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसर्‍या घटनेत विवाहिते महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रफीक रसूल इनामदार (रा. मड्डी वस्ती, सोलापूर) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहित महिलेला रफीक हा गेल्या अनेक दिवसांपासून घरासमोर येऊन वारंवार मोबाईलवर फोन करून तिला त्रास देत होता. म्हणून याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

तिसर्‍या घटनेत अल्पवयीन मुलगी जात असलेल्या रिक्षासमोर आडवी दुचाकी लावून तिला खलास करण्याची  धमकी  देऊन तिचा विनयभंग करणार्‍या  अभिषेक शिवशंकर चोरमले (रा. वैष्णवीनगर, विजापूर रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस  ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. सहायक  पोलिस  निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.