Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Solapur › वाळूचोरी करणारे डंपर केले जप्त

वाळूचोरी करणारे डंपर केले जप्त

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 9:07PMअक्‍कलकोट : प्रतिनिधी 

अक्‍कलकोट तालुक्यातील कुडल येथील भीमा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा चालू असताना प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत 66 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 5 जणांसह वाहनांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत दक्षिण पोलिस ठाण्यात चालू होते. ही कारवाई शनिवारी पहाटे ते 5 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भीमा नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून दोन बोटीव्दारे अवैधपणे वाळू तस्करी होत असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे 4 ते 5 या दरम्यान कुडल येथील भीमा नदीपात्रात धाड टाकली असता 2 बोटीव्दारे अवैध वाळू उपसा चालू होते. त्याप्रसंगी दोन्ही बोटीधारकांनी आपली बोट कर्नाटक हद्दीत पळून घेऊन जाण्यास यशस्वी ठरले. उर्वरित डंपर क्र.एम.एच.-13/एएक्स/4429, एम.एच.13/एएक्स/3805, एम.एच.45/टी/3773, एम.एच.13/9041, एम.एच.02/वायए/9232 ही पाच वाहने वाळू भरत असताना आढळून आले. ती सर्व वाहने ताब्यात घेतली असता त्यात 28 ब्रास वाळू आढळली.  तसेच 5 वाहने असा 66 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.