Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Solapur › सोलापूर : अवैद्य दारू अड्यांवर विशेष पथकाचा छापा

सोलापूर : अवैद्य दारू अड्यांवर विशेष पथकाचा छापा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बार्शी : प्रतिनिधी 

पांगरी (ता. बार्शी) पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध दारू विक्री धंद्यावर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून चिखर्डे, नारी, नारीवाडी येथील अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. ६८ हजार ८७२ च्या मुद्देमालासह चार आरोपींना विशेष पथकाच्या सदस्यांनी या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी पांगरी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बार्शी ते उस्मानाबाद रस्त्यावर धाड टाकण्यात आली. चिखर्डे येथील राजगड हॉटेल, नारी येथील येडेश्वरी हॉटेल, साई हॉटेल व नारीवाडी येथील बडे हॉटेल या तीन ठिकाणी विक्री होत असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा टाकून अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करीत असलेले संदीप नानासाहेब आगलावे (रा. चिखर्डे), शाम गणपती बदाले (रा. नारी), योगेश चंद्रकांत माळी (रा. नारी), बालाजी ऊर्फ बापू केरबा वाघ (रा. नारीवाडी ता. बार्शी) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ६८,८७२रू. किंमतीची देशी-विदेशी दारू व मुद्देमाल जप्त केला आहे. 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून हॉटेल मालकाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे अमित सुभाष कोंढारे, हरी गणपती बदाले (रा. नारी), विठ्ठल ञिंबक बडे (रा. नारीवाडी ता. बार्शी) हे असल्याने सात जणांविरूद्ध विरूद्ध पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  •