Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Solapur › महापुरुषांच्या स्मृतिदिनी निराधारांना मिळणार न्याय

महापुरुषांच्या स्मृतिदिनी निराधारांना मिळणार न्याय

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:27PM

बुकमार्क करा

सोलापूर : महेश पांढरे    

निराधारांसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना आणि ज्येष्ठ नागरिक अनुदान योजनेच्या बैठकांमध्ये सुसूत्रता यावी तसेच वेळेवर आलेल्या प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने आदेश जारी करण्यात आला असून महापुरुषांची जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त या बैठका घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
येत्या वर्षभरात संजय गांधी निराधार समितीच्या 8 बैठका होणार आहेत. यासाठी येत्या 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त, 11 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान महात्मा जोतिराव  फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, 27 मे रोजी रमाबाई आंबेडकर जयंती, 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त, तर 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका घेण्याचे आदेश शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे यादिवशी निराधारांना न्याय देण्याचा मनोदय शासनाने व्यक्‍त केला आहे. त्यामुळे यादिवशी आता शासकीय सुटीपासून कर्मचार्‍यांना मात्र, मुकावे लागणार आहे. विविध प्रकारच्या अनुदानासाठी 

दरमहा या समितीकडे हजारो अर्ज दाखल होत असतात. त्याची पडताळणी करून योग्य आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ही समिती काम करत असते.