Wed, Jul 17, 2019 20:31होमपेज › Solapur › सोलापूर : पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन

सोलापूर : पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन

Published On: Sep 12 2018 1:15PM | Last Updated: Sep 12 2018 1:15PMबेंबळे (जि. सोलापूर) : प्रतिनिधी 

माढा तालुक्यातील बेंबळे नजिक असणाऱ्या घोटी येथील वृद्ध दांपत्याचे एकाच दिवशी म्हणजे बारा तासाच्या अंतराने निधन झाल्याची घटना घडली आहे. लिलावती भोसले आणि एकनाथ भोसले असे या दांपत्याचे नावे आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, घोटीचे सरपंच नागेश भोसले यांचे वडील एकनाथ भोसले हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. उपचार करुन घरी आणले परंतु, त्यांची तब्येत जास्त बिघडल्याचा धक्का त्यांची पत्नी लिलावती यांना सहन झाला नाही. या धक्क्याने सोमवारी दुपारी चार वाजता त्‍यांचे निधन झाले. त्यांच्यांवर सायंकाळी  अंत्यसंस्कार केल्यानंतर दहा ते बारा तासांच्या आत एकनाथ भोसले यांचेही मंगळवारी पहाटे  निधन झाले. पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन झाल्याने बेंबळे घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.