Thu, Sep 20, 2018 08:40होमपेज › Solapur › पंढरपूर : पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पंढरपूर : पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

गोपाळपूर(ता.पंढरपूर ) येथे रविवारी सकाळी पतीने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुण पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. 

ऐश्वर्या अण्णासाहेब आसबे ( वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घरातील भांडणानंतर पतीने ऐश्वर्यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे ऐश्वर्याच्या नाकातून, कानातून रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पतीस ताब्यात घेतले.