Wed, Mar 20, 2019 23:23होमपेज › Solapur › मंगळवेढा येथे पतीकडून पत्‍नीसह मुलीचा खून 

मंगळवेढा येथे पतीकडून पत्‍नीसह मुलीचा खून 

Published On: Dec 04 2017 10:01AM | Last Updated: Dec 04 2017 11:40AM

बुकमार्क करा

रड्डे : वार्ताहर

सिद्धनकेरी (ता.मंगळवेढा) येथे पतीने अज्ञात कारणावरून पत्‍नी आणि मुलीचा खून केल्‍याची घटना समोर आली आहे. सुरेखा संजय कोरे आणि श्रीवणी संजय कोरे असे हत्‍या करण्यात आलेल्‍या दोघींची नावे आहेत. तर, संजय नागाप्पा कोरे (वय, 35)असे हत्‍या केलेल्‍या संशयीत पतीचे नाव आहे. 

सुरेखा ही रात्री साडेआठच्या सुमारास जेवण करत असताना संजय हा गावातून आला व त्याने जेवत्या ताटावरच तीक्ष्ण पारेने डोक्यात घाव घालून तिचा खून केला. मुलगी श्रावणी ही पण जेवण करत असताना तिचा गळा दाबून खून केला. खून झाल्याची घटना गावातील काही तरुणांनी पोलिसांना फोन करून कळवली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी घटनास्थळी भेट देऊन संजय कोरे याला अटक केली. 

संजय यांने कश्यासाठी हे कृत्य केले अद्याप समजू न शकल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे कामकाज चालू होते. 

घटनास्थळी मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.