Tue, Sep 17, 2019 22:03होमपेज › Solapur › भुकेल्या वानरांना खाऊ देऊन केला कन्येचा वाढदिवस(video)

भुकेल्या वानरांना खाऊ देऊन केला कन्येचा वाढदिवस(video)

Published On: May 19 2019 10:13AM | Last Updated: May 19 2019 11:39AM
नातेपुते : सुनील गजाकस

डोंगर कपारीत असलेल्या श्री क्षेत्र गुप्तलिंग येथील 80 पेक्षा जास्त वानरांची अन्न पाण्यावाचून उपासमार सुरू असल्याचे वृत्त दै पुढारी मध्ये प्रकाशित झाले होते. यानंतर प्राणीमित्र संजय उराडे यांनी आपल्या प्राची या कन्येचा वाढदिवस या वानरांना 5 किलो भुईमूग शेंगा, 5 किलो काकडी, 1 कॅरेट केळी चा खाऊ देऊन अनोख्या पध्दतीने साजरा केला. यामुळे त्‍यांचे सर्व स्‍तरातून कौतूक होत आहे. 

प्राणीमित्र संजय उराडे यांनी श्री क्षेत्र गुप्तलिंग येथील वानरांची अन्न पण्यावाचून उमासमार सुरू असल्‍याचे वृत्‍त दै पुढारीमध्ये वाचले होते. या वृत्‍ताने ते व्याकुळ झाले होते. त्‍यातच आज त्‍यांची कन्या प्राची हिचा वाढदिवस असल्‍याने त्‍यांनी इतर सर्व खर्चाला फाटा देत, कन्येचा वाढदिवस येथील वानरांना फळे आणि पाण्याची व्यवस्‍था करून साजरा करण्याचा निश्चय केला, आणि यातूनच त्‍यांनी आज वानरांसाठी 5 किलो भुईमूग शेंगा, 5 किलो काकडी, 1 कॅरेट केळी चा खाऊचे वाटप केले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी वानरांसाठी पिण्याचे पाणीसुद्धा सोबत आणले होते. विशेष म्हणजे भुकेल्या वानरांणी या खाऊचे स्वागत करीत प्राची आणि तिच्या भावंडांच्या सोबत दंगा मस्ती करून आनंद व्यक्त केला. 
गुप्तलिंग हे देवस्थान सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. शिखर शिंगणापूर पासून 2 किमीवर असलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात येते. डोंगर कपारीत असलेल्या या ठिकाणी 150 च्या आसपास वानरे होती. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून अन्न पाण्यावाचून उपासमार होऊ लागल्यानंतर बऱ्याच वानराणी स्थलांतर केले आहे. तुरळक पर्यटक, भाविक येतात. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात खायला मिळते म्हणून अजूनही 80 पेक्षा जास्त वानर त्या ठिकाणी आहेत. वनविभागाने त्यांच्यासाठी काहीही उपाय योजना केल्या नाहीत. आणि दुष्काळामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड घटली आहे. त्यामुळे या वानरांची उपासमार सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर दै पुढारी ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर संजय उराडे यांनी वानराना खाऊ देऊन आपल्या प्राची या कन्येचा वाढदिवस साजरा करण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार शनिवारी उराडे यांनी शेंगा, काकडी,केळी, पिण्यासाठी पाणी या वानराना गुप्तलिंग येथे जाऊन दिले आणि मुलीचा वाढदिवस साजरा केला. संजय उराडे यांच्या या अभिनव संकल्पनेचे आणि त्यांनी दाखवलेल्या प्राणी प्रेमाचे कौतुक होत असून, इतरांनीही आपल्या मुलांचे, नातेवाईकांचे वाढदिवस अशा प्रकारे साजरे करावेत अशी अपेक्षा प्राणीमित्रांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान दै पुढरीने वन्य प्राण्यांच्या प्रशनावर वृत्त प्रकाशित केल्यानंतर आपणास या बाबत माहिती मिळाली. आणि आपण मुलीच्या वाढदिवसानिमित्त वानराना खाऊ वाटप करण्याचा निर्णय घेतला, तसेच प्रत्येक रविवारी गुप्त लिंग या ठिकाणी जाऊन आपण पाणी, खाऊ वाटप करू अशी प्रतिक्रिया संजय उराडे यांनी दै. पुढारी शी बोलताना दिली.