Sat, Apr 20, 2019 08:44होमपेज › Solapur › विजयवाडीकरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार

विजयवाडीकरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 8:17PMअकलूज : वार्ताहर

विजयवाडी (ता.माळशिरस) येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गावातील स्मशानभूमीची जागा खुली करून द्यावी व इतर मागण्यासाठी गेली चार दिवसांपासून न्याय मार्गाने उपोषण सुरू असताना गावातीलच काही लोकांनी तालुक्याचे सभापतींना खोटी माहिती देऊन,चुकीची व गैरसोयीची जागा या स्मशानभूमीसाठी दिल्याचे दाखवले व या उपोषणकर्त्यांना संभ्रमात पाडले. याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

विजयवाडी ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी गेली चार दिवसापासून येथील प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. या दरम्यान प्रांत अधिकारी यांनी या उपोषणकर्त्यांना बोलावून घेऊन येत्या 23 तारखेपर्यंत तोडगा काढू, असे आश्‍वासन देत समजूत काढण्याचा प्रयत्न ही केला आहे, मात्र आंदोलक आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम आहेत. व त्यानुसार त्यांचे उपोषण सुरू आहे. असे असताना गावातील शंकर वाघमोडे यांनी या स्मशान भूमीसाठी जागा देऊन तसे बक्षीसपत्र करून दिल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. त्यामुळे या उपोषणकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. म्हणून त्यांनी या प्रकाराची चौकशी केली असता, या गावातील शंकर वाघमोडे यांनी हे गाव वसलेली जागा मूळ त्यांचे नावावर विकत घेतली होती व त्यापैकी प्रत्येक रहिवाशांना त्याचे त्याचे ऐपतीप्रमाणे प्रत्येकाला जागा विकत दिल्या. व यापैकी उर्वरित सुमारे अर्धा गुंठा जागा की ज्या जागेजवळ मुलांची अंगणवाडी आहे, या जागेवरून विजेचे खांब गेले आहेत व ही जागा पूर्ण लोकवस्तीच्या मध्यभागी आहे,अशी जागा आपण स्मशानभूमीला बक्षीसपत्राने देत असल्याचे तालुक्याचे सभापतींना सांगितले व त्यांनीही हा एक प्रश्‍न मार्गी लागतो म्हणून जादा चौकशी न करता ही जागा स्मशानभूमीसाठी ताब्यात घेण्याबाबत प्रांत अधिकार्‍यांना सांगितले. उपोषणकर्त्यांना कसलीही माहिती नसल्याने  त्यांना या जागेविषयी व ती गैरसोयीची असल्याबाबतची माहिती झाली. अशा प्रकारे या उपोषणकर्त्यांना, पंचायत समिती सभापतीना अंधारात ठेऊन त्यांची दिशाभूल व फसवणूक केली. अशी या उपोषणकर्त्यांनी अकलूज पोलीस ठाण्यात गावातील शंकर वाघमोडे, दत्तात्रय इंगळे, अनिल लावंड  आदी लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.