Sat, Jul 20, 2019 09:23होमपेज › Solapur › नवव्या दिवशी अतिक्रमणविरोधातील तिघांचे उपोषण स्थगित

नवव्या दिवशी अतिक्रमणविरोधातील तिघांचे उपोषण स्थगित

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 10:56PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

जेऊर ग्रामपंचायत हद्दीतील  अनधिकृत गाळ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी प्रजासत्ताकदिनापासून सुरु असलेले उपोषण नवव्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले. उपोषणकर्ते देवानंद पाटील, बाळासाहेब कर्चे, बालाजी गावडे या तिघांनी उपोषणकर्ते कर्चे यांच्या वृध्द आई शकुतंला कर्चे यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन हे उपोषणाची सागंता करण्यात आली.

यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल, आदिनाथचे चेअरमन संतोष पाटील, रमेश काबंळे सचिन घोलप, चंद्रहास निमगिरे, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब अडसुळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे , नासीर कबीर, अशोक नरसाळे, विशाल घोलप, अविनाश जोशी, संजय चौगुले, रामभाऊ पवार, विजय लावंड अनिल पवार, आदिनाथ  आदलिंगे, नितीन खटके, धनंजय निर्मळ, सुहास शिंदे, धनजंय गारूडी, निखील मोरे उपस्थित होते.

26 जानेवारी प्रजासत्ताकदिन दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर वरील तिघांनी उपोषण चालू केले होते. यादरम्यान जिल्हा बँक संचालिका रश्मी बागल, जिल्हापरिषद अध्यक्ष संजय शिंदे, मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांनी आंदोलकांशी चर्चा करुन व उघड पाठिंबा देऊन कार्यकारी मुख्याधिकारी राजेंद्र भारुड यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वीही अतिक्रमणाबाबत 15 ऑगस्ट 17 ला स्वातंत्र्यदिनादिवशी आंदोलकांनी आंदोलन केले होते. 

यावेळी ग्रामसेवक व सरपंच यांनी व  गटविकास अधिकारी ढवळे यांनी अतिक्रमण काढण्याच्या दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर त्यावेळचे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानतंर न्यायालयात हे प्रकरण गेल्याचे कारण पुढे करून  सहा महिने उलटले तरी प्रशासनाने कारवाई केली नव्हती. त्यामुळे हे उपोषण पुन्हा करण्यात आले. त्यामुळे जेऊर ग्रामपंचायतीची सहा फेब्रुवारी रोजी अतिक्रमणाचा विषय घेऊन बैठक घेणे. कलम 39 प्रमाणे ग्रामपंचायतीने या कामाची दखल घेतली नाही तर ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांवरही कारवाई करत प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव करणे, ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करणे, न्यायालयात कॅव्हेट दाखल करणे, तात्काळ निर्णय घेऊन अतिक्रमण काढणे आदी लेखी आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

या उपोषणादरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील यांनीही  समक्ष जेऊरचे अतिक्रमण भागाची पाहणी केली व वरिष्ठांना अहवाल सादर केला. त्यामुळे लेखी आश्‍वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

हे उपोषण संपण्यासाठी करमाळा पत्रकार संघानेही मोठी भूमिका बजावली. थेट वरिष्ठांशी चर्चा खरून उपोषणकर्त्यांशी समन्वय साधून लवकरच रितसर व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा आग्रह वरिष्ठांकडे केला. याला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी दुजोरा दिला. त्यानंतरच आंदोलकानी उपोषण स्थगित केले.