Mon, Apr 22, 2019 11:52होमपेज › Solapur › अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला धावले सहकारमंत्री

अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला धावले सहकारमंत्री

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:37PMहोटगी : प्रतिनिधी

होनमुर्गी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील शेतकरी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांना अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी ताफा थांबवून जखमीला उपचारासाठी पाठविण्यास मदत केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहकारमंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांचा ताफा होनमुर्गी फाट्यावर येताच अज्ञात वाहनाच्या धडकेत एक शेतकरी जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडला होता. ना. देशमुख यांनी क्षणात कसलाही विचार न करता गाडी बाजूला घेतली. अपघातग्रस्त शेतकर्‍याला विव्हळत पडलेला पाहून मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वतःची गाडी देऊन जखमी शेतकर्‍याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. 

फोनद्वारे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलून उपचार करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घातले. ट्रॅक्सच्या धडकेने जखमी झालेल्या शेतकर्‍याला रस्त्याच्या कडेला रक्ताने लटपटत पडलेला पाहून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्परता दाखवून त्याला मदतीचा हात दिला. 

मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल ही भावना मनात न आणता स्वतः देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकर्‍यांनी ना. सुभाष देशमुख यांचे आभार मानले.