होमपेज › Solapur › हॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू

हॉर्न वाजविल्याने मारहाण, एकाचा मृत्‍यू

Published On: Dec 07 2017 4:38PM | Last Updated: Dec 07 2017 4:38PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर 

दुचाकीचा  हॉर्न वाजविण्याच्या कारणांवरून सापटणे (भोसे, ता. माढा) येथे झालेल्या मारहाणीत गौतम नामदेव ओहोळ (वय ५०) या दलिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत माढा पोलिसात तिघांवर जातीयवाचक शिवीगाळ व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मृताचा मुलगा करण गौतम ओहोळ रा. सापटणे (भोसे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी पाच डिसेंबर रोजी सापटणे येथे मोटारसायकलचा हॉर्न वाजविण्याच्या कारणांवरून करण ओहोळ व त्यांचे वडील गौतम ओहोळ यांना सोमनाथ एकनाथ लाड, हनुमंत एकनाथ लाड, बालाजी रघुनाथ सावंत सर्व रा. सापटणे यांनी करण यास मारहाण करत असताना भांडण सोडविण्यासाठी करणचे वडील गौतम ओहोळ हे आले असता त्यांनाही संबंधित तिघांनी जातीयवाचक शिवीगाळ  करत मारहाण केली. मारहाणीत करण व गौतम ओहोळ हे दोघेही जखमी झाले होते,त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गौतम ओहोळ यांचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे हे करीत आहेत.