Tue, Mar 26, 2019 08:19होमपेज › Solapur › ‘पप्पा.. ओ.. पप्पा.. कुठे गेला होता?’

‘पप्पा.. ओ.. पप्पा.. कुठे गेला होता?’

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 1:59PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिसाने शनिवारी सकाळी माणुसकीच्या नात्याने एका अपंग वृध्दास पोटभर अन्न खाऊ घातले होते. दुसर्‍या सहकारी पोलिसाने त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. व्हिडिओ पाहून त्यांचे नातेवाईक सोलापुरात दाखल झाले व त्यांचा ताबा घेतला.

काजी पानसरे (वय 90, रा. भायखळा, मुंबई) हे वृध्द गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापुरात भीक मागून खात होते. फेब्रुवारी 2018 पासून मुंबई येथील राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. स्मरणशक्ती हरवली असल्याने अज्ञात वाहनाने सोलापुरात आले होते. त्यांची परिस्थिती पाहून पाहणार्‍यास दया येत  होती. घरच्या लोकांनी मुंबई पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. मुंबई येथील प्रत्येक ठिकाणी बेपत्ता असल्याची पत्रके वाटण्यात आली होती.

काजी पानसरे हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत. मुंबई येथे आंब्याच्या व्यवसाय आहे. परंतु वयोमनानुसार शरीराने साथ सोडली. हळूहळू स्मरणशक्ती लयास गेली. फेबु्रवारीमध्ये घरातून बाहेर पडलेले भिकाजी घरी परतलेच नाही. काही महिन्यांनंतर पोलिस जेवण खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वार्‍यासारखे पसरले.

जन्मदात्या पित्यास पाहून चारही मुलींच्या अश्रूंचा बांध फुटला.‘पप्पा....पप्पा कुठे गेला होता...’ अशी आर्त हाक देत चारही मुली पित्यास मिठी मारुन रडू लागल्या. हे द‍ृश्य पाहून हजर असलेल्या पोलिसांच्या डोळ्यांत अश्रू आले. सायंकाळपर्यंत भिकाजी पानसरे व त्यांच्या मुलीस मुंबईला रवाना केले.

‘पप्पा...ओ...पप्पा... कुठे गेला होता...’
‘पप्पा...ओ...पप्पा... कुठे गेला होता..., किती शोध घेतला...’ अशी आर्त हाक देत चारही मुली जन्मदात्या  पित्यास  मिठी मारुन रडू लागल्या. बाप-लेकींच्या भेटीचे  हे चित्र पाहून बघणार्‍या प्रत्येकाचे डोळे पाणावले. गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून दुरावलेले भिकाजी पानसरे पोलिसांच्या सतर्कतेने घरच्यांच्या स्वाधीन झाले.