होमपेज › Solapur › पंढरीत एच.आय.व्ही संक्रमितांचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

पंढरीत एच.आय.व्ही संक्रमितांचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:35PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

एच.आय.व्ही संक्रमितांना आपले  वैवाहिक जीवन जगण्याची उमेद कायम रहावी. पुढील आयुष्य आनंददायी व्हावे. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात दोन एच.आय.व्ही संक्रमितांचे  विवाह  जुळले आहेत.

येथील उपजिल्हा रुग्णालय, ए.आर.टी. सेंटर आणि आय.सी.टी.सी, परम प्रसाद ट्रस्ट संचलित विहान प्रकल्प यांच्या संयुक्‍त विद्यमाने एच.आय.व्ही संक्रमितांचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या एच.आय.व्ही. संक्रमित वधू-वर परिचय मेळाव्यास  नायब तहसीलदार एस.पी. तिटकारे, शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, सपोनि संजय धोत्रे, विहान प्रकल्प संचालक संग्राम जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. अविनाश वुईके, डॉ.अनिता धसे, श्रीमती चौधरी आदी उपस्थित होते.

 या मेळाव्यासाठी  सोलापूर, बारामती, पुणे, विजापूर, बुलढाणा, जालना, कोल्हापूर व नाशिक येथून एच.आय.व्ही संक्रमित व्यक्‍ती सहभागी झाले होते. विवाह इच्छुक 40 तरुण 18 तरुणी  यांनी मेळाव्यात आपला परिचय करून दिला. यामध्ये  विधवा व विधूर यांनी भाग घेतला होता. 

या एच.आय.व्ही संक्रमितांना सन्माने समाजात प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना जीवनाचा आधार मिळावा  यासाठी मेळाव्याचे  आयोजन केल्याची माहिती  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांनी दिली. या मेळाव्यात  दोन  विवाह  जुळले आहेत.

या मेळाव्यास बाजीराव नामदे, योगीराज विजापुरे, एजाज बागवान, भातलवंडे, स्वाती कसबे, रेखा ओंबासे, ठकार, नाडगोरा,  मीनाक्षी चोळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले.