Tue, Apr 23, 2019 18:12होमपेज › Solapur › सोलापुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

सोलापुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Published On: Apr 17 2018 7:39PM | Last Updated: Apr 17 2018 7:35PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात आज मंगळवार (दि. १७ एप्रिल) अवकाळी पावसाने वीजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. सोलापूरसह अन्य परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. 

गेल्या काही दिवसापासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आजच्या पावसाने थोडासा गारवा मिळाला. मात्र जोरदार झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकरी तसेच सर्वसामान्याची धांदल उडाली. माळीनगर, बोंडले परिसर, मोहोळ, पिलीव यासह अन्य परिसरात झालेल्या या पावसामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले होते. तर काही भागात पिकांचे नुकसान देखील झाले आहे. तर वीज कोसळून वैराग परिसरात एका बैलाचा मृत्यू देखील झाला आहे.