होमपेज › Solapur › शिवजयंतीच्या मिरवणूकीत युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

शिवजयंतीच्या मिरवणूकीत युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

Published On: Feb 20 2018 10:25AM | Last Updated: Feb 20 2018 10:25AMरड्डे : वार्ताहर

भोसे (ता. मंगळवेढा) येथे सोमवारी शिवजयंतीनिमित्त गावातून सायंकाळी सहा वाजता शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने सामील होऊन नाचत होते. मिरवणूक अंतिम टप्प्यात आली असताना मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनिल ताटे या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने जागीच मृत्‍यू झाला.

भोसे येथे सोमवारी शिवजयंतीनिमित्त गावातून सायंकाळी सहा वाजता शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने सामील होऊन नाचत होते. मिरवणूक अंतिम टप्प्यात आली असताना मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनिल ताटे या युवकाला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. यावेळी ते भोसे बसस्थानकावर बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी तातडीने त्याला मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

अनिल ताटे हा गावात बसस्थानक परिसरात पानपटपरी चालवत होता. एक उत्तम क्रिकेट खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध होता. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या युवकांचा शिवजयंती मिरवणूकीत दुर्देवी मॄत्यू झाल्यामुळे भोसे गावावर शोककळा पसरली.