होमपेज › Solapur › दांडक्याने मारहाण करून शिपायाच्या खुनाचा प्रयत्न

दांडक्याने मारहाण करून शिपायाच्या खुनाचा प्रयत्न

Published On: Jan 23 2018 1:10AM | Last Updated: Jan 22 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी

एका    शिपायाने  दुसर्‍या शिपायाच्या  डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी गुरूनानकनगरातील जलसंपदा विभागाच्या गुणनियत्रंक  उपविभाग कार्यालयात घडली. 

रावसाहेब   उत्तम  आवारे (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून सुनील विश्‍वभंर चावरिया (दोघे रा. उजनी वसाहत, गुरुनानकनगर, सोलापूर) असे जखमी शिपायाचे नाव आहे. याबाबत गुणनियत्रंक विभागातील  चौकीदार सोमनाथ नामदेव हिले (रा. उजनी वसाहत, गुरुनानकनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

सोमनाथ हिले हे जलसंपदा गुणनियत्रंक उपविभागात चौकीदार म्हणून कार्यरत आहेत, तर कार्यालय नं. 49 मध्ये  सुनील   चावरिया हा शिपाई म्हणून, तर रावसाहेब आवारे हा गुणनियत्रंक कार्यालयात शिपाई आहे. रविवारी  कार्यालयाला  सुटी असतानाही कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पवार, कनिष्ठ लिपीक क्षीरसागर हे कामासाठी कार्यालयात आले होते. पवार यांनी चौकीदार हिले यास बोलावून त्याच्या घरातील चार्जर घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे हिले हे घराकडे चार्जर आणण्यास जात असताना शिपाई रावसाहेब आवारे हा चहा घेऊन गेला. त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास घरी असलेल्या हिले यांना त्यांच्या कार्यालयात येणार्‍या संजय कांबळे (रा. कुमठा नाका, सोलापूर) याने  घरी  येऊन  सांगितले की, तुमच्या कार्यालयातील शिपाई सुनील चावरिया  यास शिपाई रावसाहेब आवारे याने लाकडी दांडक्यााने मारल्याने तो  जखमी  होऊन कार्यालयात  पडला आहे. त्यामुळे हिले हे घाबरून कार्यालयात आले असता त्याठिकाणी पोलिस आले होते.  

 जखमी चावरियाच्या पायाजवळ पिस्तुल पडलेले दिसले व हाताजवळ लाकडी दांडका पडलेला दिसला.  शिपाई   चावरिया  याच्यावर पत्नीबाबत वाईट संशय घेऊन रावसाहेब आवारे याने हा हल्ला केला. म्हणून शिपाई आवारे याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तुल जप्त केले आहे. आवारे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना सहायक पोलिस निरीक्षक पवळ यांनी रेल्वे स्टेशन येथून अटक केली.