Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात 18 ग्रा.पं.साठी 84 टक्के चुरशीने मतदान

मंगळवेढ्यात 18 ग्रा.पं.साठी 84 टक्के चुरशीने मतदान

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:52PM

बुकमार्क करा

मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील  झालेल्या 19 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने 84 टक्के मतदान झाले, तर मुंढेवाडी ग्रामपंचायतीच्या बहुतांश जागा बिनविरोध झाल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लव्हे यांनी दिली.

यात एकूण 32803 मतदारांपैकी 27423 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. यात 14617 पुरुषांनी, तर 12806 स्त्रियांनी मतदान केले. एकूण 19 ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकी अगोदरच मुंढेवाडी ग्रामपंचायतीत बहुतांश जागा बिनविरोध झाल्या असल्याने उर्वरित 18  ग्रामपंचायतींत चुरस पहायला मिळाली. 

 आ. भारत भालके, आवताडे आणि परिचारक गटाने आपल्या कार्यकर्त्यांना शक्य तितकी ताकद देण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला. निवडून येण्याच्या आशेने सदस्य उमेदवार सरपंच पदाच्या उमेदवारांच्या यंत्रणेवर अवलंबून असल्याचे या मतदाना दरम्यान दिसून येत होते. 

सकाळी 7.30 वाजल्या पासून सुरु झालेल्या मतदानाचा टक्का दुपारी 2 नंतर वाढत गेला. प्रत्येक उमेदवार मतदानासाठी येणार्‍या मतदारा जवळ जात हात जोडत होते. तर वयस्कर व्यक्तिसाठी वाहनाची सोय केलेली होती. या निवडणुकीत थेट सरपंचपद जनतेतून असल्याने बाहेर गावी असलेले अनेक मतदार खासगी वाहनाद्वारे मतदानासाठी आणले गेले. उचेठाण, निंबोणी, जालिहाळ, सिध्दनकेरी, आंधळगाव, महमदाबाद (हु) या संवेदनशील ठिकाणी तणाव असल्याने मतदान शांततेत पार पडले. तर  ब्रम्हपुरी, आंधळगाव, चिक्कलगी, हिवरगाव या गावात पं. स. सदस्य, जि. प. सदस्य अनेक पक्षाचे पदाधिकारी असल्याने तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायत निकालाकड़े लागले आहे 18 ग्रामपंचायतीच्या 18 सरपंच जागेसाठी तसेच 173 सदस्यांसाठी ही निवडणूक पार  पडली.  सरपंचपदाच्या जागेसाठी 54 तर सदस्य पदाच्या जागेसाठी 345 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मत पेटित बंद झाले असुन आज लागणार्‍या निकालकडे उमेदवारासाहित सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गाव निहाय मतदान टक्केवारी

 बठाण( 87 ), ब्रम्हपुरी (85)  ,खडकी(89),जालिहाळ (92), शेलेवाडी (95), निंबोणी(67),    मुंढेवाडी (86),  जंगलगी (88), उचेठाण (85), अकोला (90), खुपसंगी (90), आंधळगाव(82), महमदाबाद (हु)(85), शिरसी (89), जुनोनी(86),   भाळवणी (85), नंदुर ( 74 ), चिक्कलगी (76 ),  हिवरगाव(96 ) टक्के मतदान झाले आहे.