होमपेज › Solapur › जिल्ह्यात ६४ सरपंचपदे; १३८२ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यात ६४ सरपंचपदे; १३८२ उमेदवार रिंगणात

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 15 2017 9:49PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी २०३, तर सदस्यपदासाठी १३८२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सरपंचपदाच्या २०१, तर सदस्यपदाच्या ८६० उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ५ डिसेंबरपासून सुरूवात झाली होती. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही ११ डिसेंबर होती. याकालावधीत  सरपंचपदासाठी ४०८, तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी दोन हजार ३७७ उमेवारी अर्ज छाननीअखेर वैध झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरूवार, १४ डिसेंबर रोजी मुदत होती. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सरपंचपदासाठी आलेल्या ४०८ उमेदवारांपैकी २०१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, २०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सदस्यपदासाठी दोन हजार २७७ पैकी ८६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून सदस्यपदांसाठी एक हजार ३८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटपही गुरूवारी करण्यात आले असून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रचाराला चांगला वेग येणार आहे. सरपंचपदासाठी स्वतंत्र निवडणूक असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २७ रोजी मतमोजणी होणार आहे.