होमपेज › Solapur › शासकीय वसतिगृहांमुळे वंचित विद्यार्थ्यांची सोय

शासकीय वसतिगृहांमुळे वंचित विद्यार्थ्यांची सोय

Published On: Dec 31 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 11:10PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

जिथे वसतिगृह नाही तिथे नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून शासकीय वसतिगृहामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व राहण्याची सोय होत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केेले.

बार्शी शहरातील गाडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयालगत शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ना. बडोले बोलत होते. यावेळी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नगराध्यक्ष अ‍ॅड. असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज  बारबोले, समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिनेश वाघमारे, मिलिंद शंभरकर, अमित घवले, बांधकाम विभागाचे अनिल ढेपे आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री देशमुख म्हणाले की, अनेक दिवसांपासून मी समाजकल्याण खात्यांचे मंत्री व अधिकारी यांना समक्ष भेटून सोलापूर जिल्ह्यात  जिथे वसतिगृह नाहीत, तिथे नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरु करण्यासाठी प्रयत्न केले.  यापुढील काळात जिल्ह्यात आवश्यक त्याठिकाणी नवीन निवासी शाळा व वसतिगृहे बांधण्यासाठी पाठपुरावा करुन मंजुरी घेतली जाईल.राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून शिक्षण घेणार्‍यांसाठी अनेक प्रकारच्या चांगल्या योजना राबवित आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्यासाठी निवारा उपलब्ध होण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी समाजकल्याण खात्याच्या वतीने निवासी शाळा व वसतिगृह बांधली आहेत. त्याचा फायदा अनेक जणांना होत आहे.