Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Solapur › गोपाळ अंकुशरावच्या पोलीस कोठडीत वाढ

गोपाळ अंकुशरावच्या पोलीस कोठडीत वाढ

Published On: May 19 2018 10:15PM | Last Updated: May 19 2018 10:15PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी यास पुणे विशेष मोक्का न्यायालयाने २८ मे पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आठ आरोपीना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पंढरपूरचे  नगरसेवक संदीप पवार यांची 18 मार्च  रोजी भरदुपारी स्टेशन रोड परिसरातील हॉटेल श्रीराममध्ये गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तपास करताना गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी हाच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. 

शनिवारी संदीप पवार खून खटल्यातील मुख्य सूत्रधार गोपाळ अंकुशरावसह आकाश बुराडे, रूपेश सुरवसे, सचिन वाघमारे, आकार जाधव, प्रथमेश लोंढे, राहुल पगारे, पिराची लगाडे, दिगंबर जानराव आदी आठ जणांना पुणे विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. मंगेश चव्हाण यांनी मुख्य सूत्रधार गोपाळ अंकुशराव याच्या मदतीने इतर फरार आरोपींचा शोध घ्यावयाचा आहे. तसेच संपत्तीची चौकशी करायची आहे, यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. पोलिसांचे म्हणणे योग्य मानत मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी गोपाळ अंकुशरावला २८ मे पर्यंत वाढीव पोलीस कोठडी दिली आहे. तर इतर आठ आरोपींना २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. ज्ञानेश्वर मोरे, अ‍ॅड. विद्याधर कोशे, अ‍ॅड. ठोंबरे आदींनी काम पाहिले.