Mon, Jun 17, 2019 04:25होमपेज › Solapur › प्रतिकने दिले राघू पक्षास जीवदान

प्रतिकने दिले राघू पक्षास जीवदान

Published On: Jan 29 2018 5:10PM | Last Updated: Jan 29 2018 5:10PMसोलापूरः महेश माने
मोहोळ येथे राहणाऱ्या प्रतिक प्रसाद शेटे याने काटेरी झुडपामध्ये अडकून बसलेल्या व जखमी झालेल्या वेडा राघू याला जीवदान दिले. त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
प्रतिक आणि त्याचे वडील शेतामधील विहिरी जवळ फेरफटका मारत असताना अचानक प्रतिकला झुडपामध्ये वेडा राघू अडकलेला दिसला. त्याने त्याला बाहेर काढुन घरी नेऊन त्याच्यावर उपचार केले.  

 वेडा राघू हा एका चिमणीएवढा गोजिरवाणा पक्षी आहे.त्याचे शास्त्रीय नाव मेरॉप्स ओरिएंटॅलिस असून याच्या शरीराचा रंग हिरवा असून, डोके व मान यांवर सोनेरी तपकिरी आणि हनुवटी व गळा यांवर निळी छटा असते,गळ्यावर आडवा काळा पट्टा असतो. त्याची शेपटी लांब असून तिच्या मध्यावरची दोन पिसे जास्त लांब, शेपटीच्या बाहेर आलेली आणि सळईसारखी असतात.