Tue, Mar 19, 2019 11:40होमपेज › Solapur › सोलापुरात महिलेवर सामुहिक बलात्‍कार

सोलापुरात महिलेवर सामुहिक बलात्‍कार

Published On: Feb 26 2018 12:06PM | Last Updated: Feb 26 2018 12:06PMसोलापूर : प्रतिनिधी

वीटभट्टी मालकाच्या दुचाकीवरुन घराकडे जाणार्‍या कामगाराच्या पत्‍नीवर तिघांकडून सामुहिक बलात्कार केल्‍याची घटना घडली आहे. वीटभट्टी चालकाला जबर मारहाण करुन त्यांच्याकडील चार हजार पाचशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील पीडित महिला ही वीटभट्टीवर काम करणार्‍या कामगाराची पत्‍नी आहे. पती पत्‍नीमध्ये वाद झाल्याने ती रविवारी रात्री आपल्या मुलीकडे जात होती. यावेळी वीटभट्टीचा मालक दुचाकीवरुन महिलेला घरी घेऊन जात होता. यावेळी वीटभट्टी मालकाला मालकाला मारहाण करून महिलेवर तिघांकडून सामुहिक बलात्‍कार करण्यात आला. महिलेकडील दागिनेही यावेळी काढून घेण्यात आले आहेत.