Fri, Apr 26, 2019 17:29होमपेज › Solapur › राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या घरातील जुगार अड्ड्यावर छापा

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेच्या घरातील जुगार अड्ड्यावर छापा

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:17PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील मोदी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 20 जुगारींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 31 हजार रुपयांची रोकड जप्त केली असून ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली आहे. जुगार अड्ड्यातून अटक करण्यात आलेल्यांमध्ये बीएसएफचा जवान आणि भूमी अभिलेखच्या माजी उपअधीक्षकाचा समावेश आहे.

ओम दिगंबर निंबाळकर, श्रीकांत कसबे, रविंद्र चंद्रकांत घुमटे, बाळकृष्ण गोवर्धन पोतदार, नकूल सुरेश चव्हाण, शहीद जब्बार बागवान, सिकंदर अब्दुलहमीद शेख, सुनील धोंडीबा हाक्के, रणजित व्यवहारे, बाळू उघडे, सोमनाथ नागनाथ थोरात, अशोक शिंगारे, संजय काशिनाथ देशेट्टी, महादेव शिवाजी शिंदे, मुनिर बाबुमियाँ शेख, नजीर नबीलाल शेख, विजय विवेक पावले, अल्ताब शब्बीरशे, यल्लू इब्रामपूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जुगार अड्डा चालविणारा माजी नगरसेविकेचा पती फरार असून याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.