Tue, Jun 25, 2019 21:49होमपेज › Solapur › मालेगावात जुगार अड्यावर छापा, सहा जणांवर गुन्हा 

मालेगावात जुगार अड्यावर छापा, सहा जणांवर गुन्हा 

Published On: Mar 23 2018 2:16PM | Last Updated: Mar 23 2018 2:15PMवैराग : प्रतिनिधी

वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मालेगाव येथे सोलापूर जिल्हा ग्रामीण विशेष पोलिस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून दिडलाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वैराग पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार दुपारी पाच वाजता घडली.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , सोलापूर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना मालेगाव येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार मालेगाव येथील रणजित भागवत जगझाप याच्या किराणा दुकानाचे मागील खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी विशेष पथकाने छापा टाकून विलास रामू धोत्रे, ज्ञानेश्वर दादा नाईकवाडी, रणजित भागवत जगझाप, हरिदास लाला घोडके, शिवाजी मधुकर दहीभाते, शिवाजी बाबू मोरे (सर्व रा. मालेगाव) या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख सोळा हजार तीनशे सत्तर रुपये, चार मोबाईल, व चार मोटारसायकलीसह एकूण एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद विशेष पथकाचे पो. कॉ. सिध्दराम धानय्या स्वामी यांनी वैराग पोलिसात दिली .याविशेष पथकात पोलिस उपनिरीक्षक जी. एस. निंबाळकर, पो. कॉ. श्रीकांत जवळगे, पो.हे.कॉ. माने , पो.कॉ. पांडुरंग केंद्रे, पो. कॉ. गणेश शिंदे, श्रीकांत बुरजे व अक्षय दळवी यांच्या पथकाने सदरची कार्यवाही केली. याघटनेचा पुढील तपास पोकॉ नौशाद शेख करीत आहेत .