Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Solapur › नीरा खोर्‍यातील धरणे भरली, भाटघर धरणाचे स्वंयमचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता

नीरा खोर्‍यातील धरणे भरली, भाटघर धरणाचे स्वंयमचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता

Published On: Aug 13 2018 10:51AM | Last Updated: Aug 13 2018 10:51AMबोंडले : प्रतिनिधी

नीरा खोर्‍यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर ९८.६८%, नीरा-देवधर धरण ९८.२९% व वीर ८५.५७% झालेले आहे. यातील भाटघर व नीरा-देवधर ही धरणे आज सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या धरणाचे स्वंयमचलीत दरवाजे आज मध्यरात्री उघडण्याची शक्यता आहे. तसेच नीरा-देवधर धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागणार आहे. भाटघर व नीरा-देवधर धरणामधून विसर्ग वीर धरणामध्ये येणार असल्यामुळे वीर धरण उद्या दुपारपर्यंत पूर्ण क्षमतेने भरणार असून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या पासून वीर धरणामधून नीरा नदी पात्रात पाणी सुटण्याची शक्यता आहे. अशी माहिती वीर धरण उपविभागाचे उपविभागीय अभियंता अजित जमदाडे यांनी पुढरी ऑनलाईनला दिली. 

यावर्षीच्या हंगामात वीर धरण दुसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने भरणार आहे. वीर धरणात या वर्षी २२ जुलै रोजी ९७.१५ टक्के पाणी साठा झालेला होता. परंतु, पावसाने उघडीप घेतलेली होती व वीर धरणामधून नीरा उजवा व डावा कालव्यास खरीप हंगामातील आवर्तन सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी ९७.१५ टक्‍केवरून ८४.८७ टक्‍के झाली आहे. यामध्ये आजपासून पुन्हा वाढ होऊ लागलेली आहे. 

दरम्यान, मागील वर्षी आज रोजी या तीन धरणात एकूण पाणी साठा ३९.९२ टीएमसी एवढा होता त्या तुलनेमध्ये यावर्षी या तीन धरणात आज रोजी पाणी साठा ४२.७७ टीएमसी एवढा असून आज रोजी या सर्व धरणात २.८५ टीएमसी एवढा पाणी साठा जास्त आहे. मागील वर्षी भाटघर धरण ३१ ऑगस्ट रोजी तर नीरा-देवधर २६ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरलेले होते.
नीरा खोर्‍यातील धरणे भरलेली असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्हयातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. 

भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणातील पाणीपातळी
भाटघर
पाणी पातळी ६२३.०४ मी.
एकुण साठा ६६३.८४ द.ल.घ.मी. 
उपयुक्त साठा ६५६.७६ द.ल.घ.मी., 
टक्केवारी  ९८.६८, 
उपयुक्त साठा टीएमसी मध्ये २३.१९ टीएमसी.

निरा देवधर

पाणी पातळी ६६६.७० मी.
एकुण साठा ३३१.७० द.ल.घ.मी. 
उपयुक्त साठा ३२६.४४ द.ल.घ.मी. 
टक्केवारी  ९८.२९ 
उपयुक्त साठा टीएमसी मध्ये ११.५३ टीएमसी

वीर

पाणी पातळी ५७८.६० मी. 
एकुण साठा २४०.०४ द.ल.घ.मी. 
उपयुक्त साठा २२७.९५ द.ल.घ.मी. 
टक्केवारी ८५.५७
उपयुक्त साठा टीएमसी मध्ये ८.०५ टीएमसी.